खानापुरातील पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती
खानापूर : राज्य सरकारी नोकरांना सातवा वेतन आयोग व जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी दि. 1 मार्चपासून राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी काम बंद आंदोलन छेडणार आहेत. खानापूर तालुक्मयातील सर्व सरकारी नोकरांनी आपापली कामे बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघटनेचे खानापूर तालुका अध्यक्ष बी. एम. यळ्ळूर यांनी खानापूर येथील विश्रामधामात घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे आवाहन केले आहे. य् ाापूर्वी राज्यस्तरीय सरकारी नोकर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार खानापूर तालुक्मयातही कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. तातडीच्या आरोग्यसेवेसाठी कर्मचारी व फायर ब्रिगेडचे अंशत: कर्मचारी कामावर राहतील. पण तेही काळी फीत बांधून आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. पत्रकार परिषदेला राज्य सरकारी नोकरी संघटनेचे खानापूर तालुकाध्यक्ष बी. एम. यळ्ळूर, गौरवाध्यक्ष के. आर. कोलकार, टी. आर. पत्री, शिवानंद औराद, रमेश कवळेकर, एल. बी. जमादार, विनायक खण्णूकर, सुरेश गडाद, एम .एस. पुजार, सादिक पाच्छापूर, जे. पी. पाटील, शोभा सौंदत्ती व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.