शिवसेनेच्यावतीने प्रतिमेस जोडे मारो आंदोलन
व्हनाळी : वार्ताहर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. तसेच आजच्या तरूण पिढीने नवीन आदर्श घेतले पाहिजेत शिवाजी महाराज हे आता जुने झाले असून आता नवीन आदर्शाचा विचार केला पाहिजे असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले. याचा जाहिर निषेध म्हणून शिवसेनेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून कागल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने बाचणी ता.कागल येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा जाहिर निषेध करत शिवसेनंन त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केलं. तसेच वारंवार अशी बेताल वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून होत आहेत. अखंड हिंदूस्थान चे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील केलेल्या या बेताल वक्तव्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी शिवसेनेमार्फत करण्यात आली.
उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे म्हणाले, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम वारंवार राज्यपाल कोश्यारी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यपालांनी येथून पुढे जर अपमान केला तर राज्यपालांना महाराष्ट्रात फिरनं मुश्कील होईल .राज्यपालांच्या काळ्या टोपीखाली असे काळे विचार दडलेत की काय असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे. असे वक्यतव्य त्यांनी पुन्हा करू नये असे ते म्हणाले.
तालुकाप्रमुख अशोकराव पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे बेताल वक्तव्य करणा-या राज्यपाल कोश्यारी यांची राज्यपाल या पदावरून ताबडतोब हकालपट्टी करावी शिवाय असे वक्तव्य करणा-या राज्यपालानी महाराष्ट्राच्या जनतेची जाहिर माफी मागावी असे आवाहन त्यांनी शिवसेनेमार्फत केले. यावेळी युवा सेना कागल तालुका अधिकारी विकास पाटील,उत्तम चांदणे, रमेश कांबळे, आल्लाबक्ष शहाणे दिवाण, मधुकर भोसले ,विलास चव्हाण, विशाल पाटील , प्रकाश पाटील ,वैभव डोंगळे, सर्जेराव पाटील प्रकाश कांबळे, डॉक्टर के.एम. पाटील,हरी पाटील,यशवंत पाटील,धैर्यशील पाटील,वैभव पाटील, डॉ. प्रदिप पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.