कोल्हापूर सिद्धगिरी मठाच्या कार्यक्रमासह व्हिटीयूच्या पदवीदान समारंभात भाग घेणार
बेळगाव : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे गुऊवार दि. 23 फेब्रुवारी रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांचा त्यांचा हा दौरा असून गुऊवारी कोल्हापूर येथील सिद्धगिरी मठ परिसरात आयोजित केलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात ते भाग घेणार आहेत. राज्यपालांचा दौरा जाहीर झाला आहे. गुऊवारी सकाळी 9.15 वाजता इंडिगो विमानाने ते बेळगावकडे निघणार आहेत. सकाळी 10.55 वाजता सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून त्यानंतर ते कोल्हापूरला रवाना होणार आहेत. कोल्हापूर येथील कार्यक्रम आटोपून ते बेळगावला येणार आहेत. व्हिटीयू गेस्टहाऊसमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या व्हिटीयूच्या पदवीदान समारंभात ते भाग घेणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी इंडिगो विमानाने ते बेंगळूरला रवाना होणार आहेत, असे राजभवनमधून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.