जिथे स्वामी विवेकानंदनी मुक्काम केला होता
प्रतिनिधी /मडगाव
राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गुरूवारी मडगावच्या श्री दामोदर सालला भेट दिली. जिथे स्वामी विवेकानंद त्यांच्या ऐतिहासिक गोव्याच्या भेटीदरम्यान मुक्काम केला होता. आजही ही पवित्र वास्तु जशाच्या तशीच जपल्याने राज्यपालांनी समाधान व्यकत केले.
राज्यपालाच्या या भेटीच्या वेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, वास्तुचे मालक प्रदीप नायक, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, भाई नायक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी दामोदर सालमधील श्री दामबाबाचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर गोवा संपूर्ण यात्रेअंतर्गत नावेली मतदारसंघाला भेट दिली. यावेळी त्यांनीडायलिसिस आणि कर्करोगाच्या रुग्णांना आर्थिक मदत केली.
नावेली मतदारसंघातील स्थानिक पंचायतींच्या सरपंच आणि इतर पंच सदस्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले की, जनतेला राजभवनात बोलावण्याऐवजी राजभवन जनतेच्या दारात आले आहे. देशाच्या लोकशाही व्यवस्थेत जनताच सर्वोच्च आहे.
नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी गोवा संपूर्ण यात्रा राबविल्याबद्दल राज्यपालांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. नावेली मतदारसंघातील जनतेने केलेल्या विविध प्रगती आणि विकासाची माहितीही त्यांनी राज्यपालांना दिली.
या दौऱयात राज्यपालांनी अवर लेडी ऑफ रोझरी चर्चला भेट दिली आणि आशीर्वाद घेतला. यावेळी राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, आयएएस (निवृत्त), अतिरिक्त जिल्हाधिकारी परेश फळदेसाई तसेच इतरांची उपस्थिती होती.