प्रतिनिधी / बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ ( आरसीयू ) चा १० वा पदवीदान सोहळा बुधवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२.३० वा हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला राज्यपाल थावरसिंग गेहलोत, उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण उपस्थित राहणार आहेत. बेलगावसह विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील ४३ हजार विद्यार्थ्यांना यावर्षी पदवी मिळणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.एम.रामचंद्र गौडा यांनी सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.