ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Pathari Gram Panchayat Election ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपचा सरपंच निवडून आला आहे. भंडारा जिल्ह्यातील पाथरी ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी ‘आप’च्या विद्या गुरुदास कोहळे (Vidya Kohale) विजयी झाल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे.
राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. रविवारी पार पडलेल्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे. सार्वत्रिक निवडणुकीतून थेट सरपंचाची निवड झाली आहे. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, काही जागांवरील विजयी उमेदवारांची नाव जाहीर झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील पाथरी ग्रामपंचायतीने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे. याचं कारण म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचा सरपंच निवडून आला आहे.