काकतीनजीक उत्तर कर्नाटकातील आलिशान गृहप्रकल्पाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : किफायतशीर किंमत
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प ‘स्वर्णगृह’ फेज-2 चा शुभारंभ शुक्रवारी मोठ्या थाटात करण्यात आला. काकतीजवळील बर्डे ढाब्यानजीकच्या या गृह प्रकल्पाचा शुभारंभ जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. फेज-1 ला बेळगावकरांनी तुफान प्रतिसाद दिल्याने स्वर्णगृह-2 च्या बांधकामाचा शुभारंभ केला. बेंगळूरस्थित फेलिसिटी अडोब एलएलपी या कंपनीने हा प्रकल्प विकसित केला आहे. बेळगावच्या नागरिकांना अत्यंत कमी किमतीमध्ये प्रिमियम दर्जाचे फ्लॅट्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तुमकूर, कोलार येथे यशस्वीरीत्या प्रकल्प केल्यानंतर आता बेळगावमध्ये स्वर्णगृह उभारले जात आहे. पहिल्या टप्प्यात 300 फ्लॅट विक्री करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात 500 हून अधिक फ्लॅटचे बांधकाम केले जात आहे. यामध्ये दोन आणि तीन बीएचके फ्लॅट, 24 तास सुरक्षा, स्वीमिंग पूल, कम्युनिटी हॉल, चिल्ड्रन पार्क, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल कोर्ट व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रारंभी फेलिसिटीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रणव शर्मा यांनी स्वर्णगृह प्रकल्पाविषयीची माहिती दिली. बेळगावमध्ये 12 टॉवर्समध्ये 1200 हून अधिक फ्लॅट्स उभारणीचा आमचा विचार आहे. यामुळे रोजगार निर्मिती तर होईलच. याबरोबरच बेळगावच्या विकासामध्ये भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वर्णगृह प्रकल्पाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
उद्घाटनाप्रसंगी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वर्णगृह प्रकल्पाचे कौतुक केले. काकतीसारख्या ग्रामीण भागामध्ये स्वर्णगृहने गृह प्रकल्प निर्मिती करून ग्रामीण भागाचा विकास सुरू केला आहे. काकती परिसरात औद्योगिक वसाहत व इतर उद्योगधंदे असून येथील नागरिकांना कमी किमतीत घरे मिळणार असल्याने त्यांच्यासाठी ही पर्वणी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला कंपनीचे संचालक शिव पाटील, माजी जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, माजी जि. पं. सदस्य सिद्दनगौडा सुणगार, किरण रजपूत, महांतेश मगदूम यांच्यासह परिसरातील नागरिक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना व्हिडिओच्या माध्यमातून प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्यात आली.
होम ऑटोमेशनची सुविधा
स्वर्णगृह प्रकल्पामध्ये जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आपल्या घरावर ग्राहकांना लक्ष ठेवता येईल. डोअर लॉक अथवा अनलॉक करणे, एसी, लाईट मोबाईलवरून ऑपरेट करता येणार आहे. यासाठी कंपनीने एक सॉफ्टवेअर डेव्हलप केले असून याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.