बेळगाव : कंग्राळी खुर्द येथे मसणाई यात्रेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे घेण्यात येणारे भव्य कुस्ती मैदान 18 मार्च रोजी राष्ट्रीय दर्जाचे मैदान घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. प्रमुख कुस्ती महाराष्ट्राचा अस्सल मल्ल सिकंदर शेख व अभिषेक गुज्जर यांच्यात होणार आहे. कंग्राळी खुर्द येथील बलभीम व्यायामशाळेत घेण्यात आलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऑलिम्पिकपटू एम. आर. पाटील होते. दरवर्षी हे कुस्ती मैदान जानेवारी महिन्यात भरविले जात होते. काही कारणास्तव हे मैदान यावर्षी मार्च महिन्यात घेण्यात येत आहे. यावर्षीच्या मैदानाचे खास आकर्षण म्हणजे संपूर्ण देशात कुस्ती क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राच्या मल्ल सिकंदर शेख विरुद्ध अभिषेक गुज्जर यांची कुस्ती होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार विरुद्ध पंजाब केसरी कमलजीत यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती रोहित (लहान कंग्राळी) विरुद्ध मोनू (हरियाणा), चौथ्या क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार (कार्वे) विरुद्ध सत्पाल नागटिळक (ता. गंगावेस) यांच्यात होणार आहे.
Previous Articleअॅथलेटिक्स स्पर्धेत गोमटेशचे यश
Next Article बेळगावच्या स्केटिंगपटूंना 57 पदके
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.