बेळगाव / प्रतिनिधी
येथील जवाहरलाल नेहऊ वैद्यकीय महाविद्यालयाने 11 आणि 12 फेब्रुवारीला ‘पीजी एक्सेल-2023’ महापरिषदेचे आयोजन केले असून शनिवारी (11 फेब्रुवारी) या कार्यक्रमाचा शानदार प्रारंभ करण्यात आला आहे. या महापरिषदेला केएलई सेंटेनरी कन्व्हेन्शन केंद्रात होत आहे. कार्यक्रमाला 350 प्रतिनिधी आणि 55 माननीय विशेष तज्ञांची (पॅकल्टी) उपस्थिती लाभली.
प्रथम दिवशी केएलई अॅपॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च किंवा ‘काहेर’चे उपकुलगुऊ डॉ. नितीन एम. गंगाणे हे प्रमुख अतिथी होते. त्यांनी उपस्थित प्रतिनिधी आणि तज्ञांसमोर भाषण करताना पदव्युत्तर (पीजी) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. व्ही. ए. कोठीवाले (रजिस्ट्रार काहेर), डॉ. व्ही. डी. पाटील (संचालक, ऊग्णालय विकास आणि नवे प्रकल्प), डॉ. एन. एस. महंतशेट्टी (प्रिन्सिपॉल, जे. एन. मेडिकल कॉलेज), डॉ. शिवकुमार एम. सी. (आयएसए सचिव), डॅ. मंजुनाथ एच. जी. (आयएसए, अॅपॅडेमिक चेअरमन) हे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. महापरिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. गुऊलिंगाप्पा ए. पाटील (आयएसए अध्यक्ष, कर्नाटक विभाग) यांनी भूषविले होते. मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवृत्त सादरीकरणामुळे उपस्थितांना संबंधित विषयांची सखोल आणि सविस्तर माहिती प्राप्त झाली. तसेच या क्षेत्रात आधुनिक कल कोणते विकसीत होत आहेत, याचीही माहिती झाली. डॉ. राजेश माने (अॅनास्थेशिऑलॉजी विभाग प्रमुख) यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ, मंजुनाथ पाटील यांनी आभार मानले. या महापरिषदेत पदव्युत्तर परीक्षांचे अनेक तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक अत्यावश्यक असणारे मार्गदर्शन करणार आहेत.