पणजी : सत्यवती सोयरू आँग्ले उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी शायना मिराशी, द किंग्ज स्कूलचा इयत्ता अकरावीचा विद्यार्थी श्यामसुंदर व्यंकटेश आणि नेव्ही चिल्ड्रन स्कूल गोवाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहाना संघवी यांनी राष्ट्रीय वैज्ञानिक प्रतिभा शोध चॅम्पियनशिप ’विद्यार्थी विज्ञान मंथन’ मध्ये घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाने राज्याचा नावलौकिक वाढला आहे. शायना हिने पहिला ’हिमालयन’ पुरस्कार (राष्ट्रीय पुरस्कार) पटकावला. तर श्यामसुंदर याने दुसरा ’हिमालयन’ पुरस्कार पटकावला. आहाना पश्चिम विभागाची विजेती ठरली. ’विद्यार्थी विज्ञान मंथन’ हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आहे. इयत्ता सहावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषय लोकप्रिय करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यासाठी सर्वप्रथम इयत्ता सहावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली आणि दुसरी राज्यस्तरीय लेखी परीक्षा घेण्यात आली. पहिल्या राज्यस्तरीय परीक्षेत गोव्यातील 1850 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने उत्तरे दिली. यापैकी कनिष्ठ श्रेणीतील (इयत्ता 6 वी ते 8 वी) 48 व वरिष्ठ श्रेणीतील (इयत्ता 9 वी ते 11 वी) 41 विद्यार्थी दुस्रया राज्यस्तरीय परीक्षेसाठी निवडले गेले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, तिऊवनंतपूरम येथे विज्ञान भारती आणि ’एनसीईआरटी’ द्वारे 20 मे आणि 21 मे रोजी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील शिबिरात (चॅम्पियनशिप) प्रत्येक वर्गातील दोन अव्वल विद्यार्थ्यांना म्हणजेच राज्यातील एकूण 12 विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सादरीकरण, वैज्ञानिक समज, नावीन्यता, सर्जनशीलता, ’आउट-ऑफ-बॉक्स’ विचार आणि नेतृत्व गुण या आधारावर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत एकूण 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शायना मिराशी आणि श्यामसुंदर व्यंकटेश या विदयार्थ्यांना अनुक्रमे ऊ. 25,000 आणि ऊ. 15,000 रोख पारितोषिक आणि चषक, गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले. एका वर्षासाठी दरमहा ऊ. 2000 स्टायपेंड देण्यात येईल. आहाना संघवी हिला ऊ. 2000 रोख बक्षीस, ट्रॉफी आणि गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले. अतुल नाईक यांनी राज्य समन्वयक म्हणून राष्ट्रीय शिबिरात विद्यार्थ्यांना मदत केली. यावेळी विज्ञान परिषद गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे, कोषाध्यक्ष समीर पाटील, सचिव मनोहर पेडणेकर, ’विद्यार्थी विज्ञान मंथन’चे राज्य समन्वयक लेफ्टनंट महेश गावखरे, कोअर कमिटी सदस्य शुभांगी अग्नी आणि अमेय शिरोडकर यांनी राष्ट्रीय शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले