वृत्तसंस्था/ लॉस केबोस (मेक्सिको)
एटीपी टूरवरील येथे शनिवारी झालेल्या मेक्सिको खुल्या लॉस केबोस पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ग्रीकचा टॉपसिडेड टेनिसपटू सित्सिपसने एकेरीचे अजिंक्यपद पटकावताना अॅलेक्स डी मिनॉरचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सित्सिपसने ऑस्ट्रेलियाच्या डी मिनॉरचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. गेल्या 14 महिन्यांच्या कालावधीतील सित्सिपसची एटीपी टूरवरील हे पहिले विजेतेपद आहे. 24 वर्षीय सित्सिपसच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हे दहावे अजिंक्यपद आहे.