तरुणभारत ऑनलाइन टीम
ग्रीन टी पिणे लाभदायक मानलं जातं. आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक जण ग्रीन टी पितात. आणि ग्रीन टी शरीरासाठी आरोग्यदायक देखील ठरते. पण वजन कमी करण्याव्यतिरिक्त ग्रीन टी पिण्याचे अनेक फायदे आहेत.याशिवाय ग्रीन टी मध्ये अनेक पोषक तत्वे असतात.जाणून घेऊया ग्रीन टी चे आणखी कोणते फायदे आहेत.
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.तसेच ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे त्वचेच्या खराब झालेल्या पेशी सुधारण्यास मदत करतात. यामुळे त्वचेवर जळजळ होण्याची समस्या दूर होते, तसेच मुरुमांची समस्याही दूर होते.मधुमेहासाठी देखील ग्रीन टी उपयुक्त ठरते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.तसेच ग्रीन टी घेतल्यानंतर जो त्रास संधिवातामध्ये होत असतो त्यातही आराम मिळतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी म्हणजेच शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम ग्रीन टी करत असते. त्यामुळे अति लट्ठपणा तर कमी होतोच परंतु त्यासोबतच धमन्यांमध्ये जमा होणारे कोलेस्ट्रॉल तयार होत नाही अथवा कमी प्रमाणात निर्माण होते आणि यामुळे रक्तप्रवाह सुरळीत चालतो व हृदयाचा धोका कमी होतो.याबरोबरच सकाळी ग्रीन टी चे सेवन केल्यास थकवा देखील कमी येतो आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.पण काही लोक दिवसातून अनेक वेळा ग्रीन टी पितात.जे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते.म्हणून दिवसातून २ ते ३ कप ग्रीन टी पिणे लाभदायक आहे.