तुम्ही उपमुख्यमंत्री असताना बारामतीत किती दिला हे जाहिर करू का? पाटणला नैराश्यामध्ये दादांचे भाषण झाले; विनायक राऊत यांना दोन दिवसांचा अलटीमेंटम; दादा आमच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं तुम्हाला का पोटशूळ
सातारा प्रतिनिधी
ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी केलेले वक्तव्य हे धादांत खोटे आहे. त्यांनी दोन दिवसात पुरावे द्याबेत किंवा जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे अशा शब्दात अलटीमेंटम देत आम्ही कोणत्या ही राऊताना थारा देत नाही, असे परखड मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. दरम्यान, दादा माझ्या तब्बेतीवर अजिबात जाऊ नका.मी शड्डू ठोकला आहे आणि दहा वेळा ठोकणारच. पाटण विधानसभा मतदार संघात ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी तसेच बाजार समितीत विजय खेचून आणला आहे. निधीच बोलाल तर दादा तुम्ही उपमुख्यमंत्री असताना बारामतीसाठी किती निधी दिला हे जाहीर करायला लावू नका, अशा शब्दात त्यांनी विरोधी पक्ष नेते अजितदादा यांना ठणकावले.
शासकीय विश्रामग्रह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे काहीतरी बरळले आहेत. मी त्यांनी केलेल्या वक्तव्य क्लिप मिळवून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी केलेले वक्तव्य हे1001 टक्के खोट आहे. दोन दिवसात त्यांनी केलेले विधान मागे न घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. वेळप्रसंगी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. जेव्हा आम्ही सुरतच्या दिशेने निघालो तेव्हाच आमचा संबंध तुटला आहे. तेव्हापासून मी कधीही ठाकरे कुटूंबाशी संपर्क साधलेला नाही. अर्धा सेकंद सुद्धा बोलणं झालेला नाही. उलट मीच महाविकास आघाडीतले आमदार आमच्या संपर्कात आहेत असे सांगताच मला बदनाम करण्याच्या हेतूने राऊत यांनी ते वक्तव्य केले आहे. कोणत्याही राऊत यांना आम्ही थारा देत नाही, आशा शब्दात त्यांनी परखड मत मांडले.
अजितदादांचे नैराश्यातुन भाषण
आज माझ्या 261 पाटण विधानसभा मतदार संघात अजित दादा होते. त्यांच भाषण टीव्हीवर पाहिले. फारच रटाळ नैराश्यातून केलेले वाटत होतं.मी ही आज मतदार संघात कार्यक्रमात होतो. जाताना पाहिलं एकदोन ठिकाणी त्यांचे बॅनर दिसले. पाच दहाच्या वर कुठं कार्यकर्ता दिसत नव्हता. पाटण मध्ये एकच कमान दिसत होती. एवढं थंड स्वागत झालेले पाहून आणि समोर तुरळक कार्यकर्ते पाहून अजितदादाना नैराश्य आलं अन त्यांनी असें भाषण केले. सत्यजित पाटणकर यांचे दोन मोठे पराभव केल्यामुळे ते गल्लीतग्रस्त झाले आहेत, अशी ही टीका त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, माझ्या मतदार संघातील निधी बाबत दादा बोलले. दादा हनुमान मंदिर आहे तिथं निधी टाकला आहे पण तुम्ही उपमुख्यमंत्री असताना बारामतीत काय काय केले कुठं कुठं निधी टाकला, किती हजार कोटींचा निधी दिला हे मला जाहीर करायला लावू नका. एक बोट तुम्ही आमच्याकडे कराल पण चार बोट तुमच्याकडे आहेत. अजितदादांनी माझ्या कार्यकर्त्यांनी लावलेले शड्डू ठोकले बॅनर पाहिले असतील अन त्यांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, दादा माझ्या तब्येतीवर जाऊ नका, माझी तब्बेत तशी जरी असली तरी 45 वर्ष सत्ता असलेली बाजार समिती आणली आहे, 30 हुन ग्रामपंचायत आणल्या आहेत, सोसायटी आणल्या आहेत. माझ्या शड्डूत किती दम आहे ते दाखवून दिले आहे मी एक वेळ नाही तर दहा वेळा ठोकणार आहे, अशा शब्दात त्यांनी मत व्यक्त केले. पुढे त्यांनी ताफ्याच्या प्रश्नावर सुद्धा दादा उपमुख्यमंत्री असताना दुप्पट वाहनांचा ताफा होता, असे ही जाहीर केले.
संजय राऊत यांचा ही समाचार
संजय राऊत यांनी केलेल्या विधानाबाबत छेडले असता ते म्हणाले, राऊत यांनी नुसत कोबड्यांचं खुराड नाही तर त्याही पुढं जाऊन त्यांनी सूरीबाबत बोलले होते वास्तविक त्यांच्याच मानेवर पत्राचाळीच्या भ्रष्ट्राचाराची लटकती सुरी आहे. ती खाली आल्यावर त्यांना कळेल अशा शब्दात त्यांनी टीका केली.
दादा कार्यकर्ते जेसीबीनेच फुल उधळून स्वागत करणार
दादांनी जेसीबीने मुख्यमंत्री यांचे फुलांची उधळण करत स्वागत केल्याबाबत बोललं असल्याचे पत्रकारांनी सांगताच ते म्हणाले मुख्यमंत्री यांच्यावर इथली जनता प्रेम करते तुम्ही बीडला गेला होता तेव्हा तुमचे ही स्वागत केले होते आठवा जरा. तुम्हाला का एवढा पोटशूळ अशी ही टीका करत ते म्हणाले, जेसीबी कुठे लावले,किती कामे केली याचा सात बारा 2024 च्या निवडणूकी पूर्वी देणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जागा वाटपाच्या प्रश्नी ते म्हणाले, शिंदे साहेब आणि फडणवीस हेच दोघे निर्णय घेतील असे ही त्यांनी स्पष्ट केले.
गोगावले यांच्याशी मन मोकळा संवाद
सातारच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे भरत गोगावले हे आले असून त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे स्वागत करण्यात आले त्यांच्याशी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मनमोकळा सवांद साधला.