किणये
स्वामीनगर, मच्छे येथील हरिओम महिला भजनी मंडळाच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील अनेक महिला भजनी मंडळांना संगीत शिकविणारे शिक्षक शंकर पाटील यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. प्रारंभी शंकर पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गुरुपौर्णिमेबद्दल महिलांची भाषणे झाली. त्यानंतर महिलांचा भजनाचा कार्यक्रम झाला. सारिका चौगुले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महिला व परिसरातील नागरिक उपस्थित होते.