ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण
अक्कलकोट प्रतिनिधी
सुलेरजवळगे येथे ग्रामस्थ पाठलाग करताना चोराचा विहीर पडुन अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सुलेरजवळगे ता.अक्कलकोट येथेच शनिवारी २० आँगस्ट रात्री ९ वाजल्यापासुन ते रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान सहा घरे फोडुन अज्ञात चोरट्याने ५८ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला.
पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, भागुबाई ख्यामगोंडे यांच्या घरातील आतील खोलीत ठेवलेले लोखंडी कपाट फोडुन कपाटात ठेवलेले सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली. कुलुप उचकटुन चोराने एकुण ५८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. पहाटे साडेसहा वाजता. हा प्रकार उघडकीस आला. याच दिवशी सुलेरजवळगे येथील मड्डी वस्ती येथील शब्बीर लावणे, व्हा. पुजारी, गोपाळ खुने, कविता वाघमोडे, जयश्री चव्हाण यांच्याही घरात चोरी झाली. याबाबतची फिर्याद श्रीमती भागुबाई अमोगसिद्ध ख्यामगोंडे यांनी दिली. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण लोकरे हे करत आहेत.
पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी सुलेरजवळगे येथे झालेल्या चोराच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसुरक्षा दलाचा रात्रभर गावात पहारा होता. तरीही या परिसरात चोरी झाली.