हस्तकला कारागीर कामगार कल्याण संघाचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांना निवेदन
कोल्हापूर ः17- पी. ए. 5- हस्तकला कारागिरांसाठी हस्तकला कारागिर कल्याण महामंडळ स्थापन करा, या मागणीचे निवेदन कामगार मंत्री डॉ. सुरेश खोड यांना देताना हस्तकला कारागिर कामगार कल्याण संघाचे पदाधिकारी.
प्रतिनिधी/कोल्हापूर
हस्तकला कारागिरांना पच्चावनाव्या वर्षापासून सहा हजार रूपये पेन्शन योजना लागू करावी. हस्तकला कारागिरांसाठी हस्तकला कारागिर कल्याण महामंडळ स्थापन करावे किंवा कामगार कल्याण मंडळात समाविष्ठ करावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन हस्तकला कारागिर कामगार कल्याण संघाच्या वतीने कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांना दिले.
निवेदनात म्हंटले आहे, हस्तकला कारागिर कामगारांच्या कुटुंबियांना मोफत दवाखाना व औषधपचार मिळावे. हस्तकला कारागिरांना मोफत घरे मिळावी. हस्तकला कारागिरांना दारिद्रय़रेषेखालील (अंत्योदय) यादीत नाव समाविष्ठ करावे. विमा योजना लागु करावी. कारागिरांच्या मुलांना मोफत शिक्षण व शिष्यवृत्ती मिळावी. कोरोनात देश बंद असल्यो कारागिरांचे मोठे नुकसान झाले आहे, ती नुकसान भरपाई द्यावी. हस्तकला कारागिरांना उद्योगभवन, खादी ग्रामोद्योग व इतर महामंडळाकडून व मुद्रा योजनेतून उद्योग धंद्यासाठी कर्ज ताबडतोब मिळावे व कर्जाला 10 लाखापर्यंत तारण व जमीन घेवू नये. यावेळी अध्यक्ष दिपक यादव, शिवा चव्हाण, अमित कुंभार आदी उपस्थित होते.