बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे (इस्कॉन) आयोजित केलेली 25 वी हरेकृष्ण रथयात्रेला शनिवारी प्रारंभ होत आहे. शनिवारी दुपारी 1 वाजता धर्मवीर संभाजी चौकातून या रथयात्रेस प्रारंभ होईल. सुरुवातीला इस्कॉनच्या ज्येष्ठ संन्याशांच्या उपस्थितीत रथयात्रेस हिरवा बावटा दाखवल्यानंतर उपस्थित भाविकांकडून रथ ओढला जाईल. भव्य रथामध्ये राधाकृष्ण आणि गीताई गौर भगवान यांच्या मूर्ती असतील. संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्लीमार्गे कपिलेश्वर ओव्हर ब्रिजवरून ही रथयात्रा शहापूरमधून नाथ पै सर्कलकडून कंकणवाडी कॉलेजमार्गे गोवावेसला पोहोचेल. तिथून इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळ मंदिरच्या परिसरात सायंकाळी साडेसहा वाजता थांबेल. त्यानंतर तेथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 29 व सोमवार दि. 30 हे दोन्ही दिवस सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Previous Articleदर्शन रावळ, सीयाना कॅथरीन यांची उद्या लाईव्ह कॉन्सर्ट
Next Article ‘तरुण भारत’ परिवारातर्फे प्रजासत्ताक दिन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.