वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियात नियमितपणे खेळवण्यात येत असलेल्या महिलांच्या बिग बॅश लिग टी-20 स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मेलबोर्न रिनेगेड्स संघातील आपले स्थान कायम राखले आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेली हरमनप्रीत कौर ही एकमेव भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
ऑस्ट्रेलियात झालेल्या पहिल्या महिलांच्या बिग बॅश लिग क्रिकेट स्पर्धेत भारताच्या एकूण 18 महिला क्रिकेटपटूंचा समावेश होता. दरम्यान या स्पर्धेसाठी यावेळी विदेशातील क्रिकेटपटूंबरोबर विविध क्लबनी कारार केलेला नाही. दरम्यान मेलबोर्न रिनेगेड्सने हरमनप्रीतचे स्थान कायम ठेवले आहे. मेलबोर्न रिनेगेड्समध्ये विंडीजच्या हिली मॅथ्यूजचाही समावेश आहे. हरमनप्रीत कौरने 2021-22 च्या महिलांच्या बिग बॅश क्रिकेट स्पर्धेत 12 डावात 58 धावांच्या सरासरीने 406 धावा जमवताना 3 अर्धशतके नोंदवली तर गोलंदाजीत तिने 15 गडी बाद केले आहेत. 2016-17 च्या महिलांच्या बिग बॅश स्पर्धेत हरमनप्रीत कौरने पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शवताना सिडनी थंडर संघाशी करार केला होता.