जम्मू-काश्मीरमध्ये सेवाबजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले हवालदार मयूर चंदनशिव यांच्या पार्थिवावर बेळगावच्या पंतबाळेकुंद्री गावात शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.जम्मू आणि काश्मीरच्या हद्दीत गेल्या ४२ वर्षांपासून सेवारत हवालदार मयूर चंदनशिव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज त्यांचे पार्थिव मुळगाव पंतबालकुंद्रीला आणण्यात आले. सजवलेल्या लष्करी वाहनातून गावामध्ये त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गावात बंद पाळून जवानाला श्रद्धांजली वाहण्यात आली. गावामध्ये पार्थिव पोहचताच कुटुंबीयांचा शोक अनावर झाला. पार्थिव अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात आले. लष्करी इतमामात अंत्यविधी करण्यात आले .
या वेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना माजी जवान कल्याण संघटनेचे अध्यक्ष एमजी पाटील यांनी अधिक माहिती दिली. पाणावलेल्या डोळ्याने कुटुंबीयांनी आपल्या कुटुंबाचे सदस्याला अखेरचा निरोप दिला. या वेळी अमर रहे… अमर राहेच्या घोषणाने गावकऱयांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
Related Posts
Add A Comment