वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय डेविस संघाच्या कर्णधारपदी रोहित राजपालची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेने शनिवारी ही घोषणा केली आहे. भारतीय डेविस संघाचा रोहित राजपाल हा बहिस्त कर्णधार असून त्याची नियुक्ती 31 डिसेंबर 2024 पर्यंत करण्यात आली आहे.
रोहित राजपाल हा भारतीय डेविस संघाचा अलिकडच्या कालावधीतील यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. अखिल भारतीय टेनिस संघटनेने राजपालची पुन्हा कर्णधारपदी फेरनियुक्ती केली आहे. 2019 पासून तो भारतीय संघाचा बहिस्त कर्णधार आहे. आता डेविस चषक स्पर्धेत भारताची लढत कझाकस्तानमध्ये होणार आहे. 2024 च्या डेविस चषक स्पर्धेत भारतीय संघाने विश्व गट 1 प्लेऑफमध्ये स्थान मिळविले आहे.