प्रतिनिधी / बेळगाव
मुतगा येथे एका विहिरीत शीर विरहित धड आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आली आहे.
घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार हे शीर एका युवकाचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खुनाच्या सत्राने नागरिक हैराण झाले आहेत.