टोरंटो : कॅनडाने स्वत:च्या नागरिकांना धूम्रपान करण्यापासून रोखण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. तंबाखूपासून होणारे मृत्यू कमी करण्याच्या प्रयत्नांतर्गत कॅनडाने आता थेट सिगारेटवर आरोग्य विषयक इशारा लेबलची घोषणा केली आहे. सिगारेटच्या धुरामुळे लहान मुलांना नुकसान पोहोचत असते, सिगारेट ल्यूकेमियाचे कारण आहे अशाप्रकारचे संदेश लवकरच कॅनडात प्रत्येक सिगारेटवर इंग्रजी तसेच फ्रेंच भाषेत दिसून येणार आहेत. आता कंपन्यांना प्रत्येक सिगारेटवर आरोग्य विषयक इशारा छापावा लागणार आहे. अशाप्रकारचा निर्णय घेणारा कॅनडा हा जगातील पहिला देश ठरला आहे. तंबाखूजन्य उत्पादनांचे पॅकेजिंग आणि इशारा नियम हे धूम्रपान सोडू इच्छिणाऱ्या प्रौढांच्या मदतीसाठी लागू केले असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी एका पत्रकात नमूद केले आहे. प्रत्येक सिगारेटवर इशारा छापण्यात आल्याने लोकांचे त्याकडे लक्ष जाईल असा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. हा नियम 2035 पर्यंत कॅनडातील तंबाखूचा वापर 5 टक्क्यांपेक्षा कमी करण्याच्या लक्ष्याचा हिस्सा असल्याचे कॅनेडियन कॅन्सर सोसायटीचे वरिष्ठ धोरण विश्लेषक रॉब कनिंघम यांनी सांगितले आहे.
Previous Articleएलॉन मस्क पुन्हा बनले जगातील श्रीमंत व्यक्ती
Next Article पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्फोट, 6 ठार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.