उपस्थित राहण्याचे वकिलांचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
मराठीतून परिपत्रके द्यावीत, या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 2017 साली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी परवानगी न घेता हा मोर्चा काढण्यात आला म्हणून 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी जेएमएफसी द्वितीय न्यायालयात सुरू असून बुधवार दि. 22 रोजी याची सुनावणी होणार आहे. तरी सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ऍड. महेश बिर्जे यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता.
दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार संभाजी पाटील (मयत), माजी आमदार अरविंद पाटील, प्रकाश मरगाळे, सरिता पाटील, सरस्वती पाटील, गजानन दड्डीकर, रतन पवार, माजी आमदार दिगंबर पाटील, निंगोजी हुद्दार, मदन बामणे, हणमंत मजुकर, राजू बिर्जे, महेश जुवेकर, संजय शिंदे, रामचंद्र हिरोजी, सूरज कणबरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले
आहे.