कानूर/वार्ताहर
गेल्या 24 तासात मुसळधारपाऊस पडत असून घटप्रभा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 172 मी मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. प्रकल्पाच्या खाली असणारे सावर्डे कानडी आणि अडकूर हे बंधारे पाण्याखाली गेले असून हीं डडगाव पुलावर ही पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आज अखेर 1951 इतके मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पहाटेपासूनच आज पावसाचा जोर वाढला असून घटप्रभा नदीच्या सकल भागात पाणी पत्रा बाहेर गेले आहे
हे ही वाचा : पावनखिंड येथे मद्यधुंद तरुणांची स्थानिकांकडून धुलाई