प्रतिनिधी/ बेळगाव
ब्रेनडेड झालेल्या एका महिलेच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय त्या महिलेच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यामुळे तीन जणांना जीवदान मिळाले. 48 वषीय कमलव्वा केलगेरी या महिलेचा धारवाडजवळ कृषी विद्यापीठानजीक अपघात झाला होता. त्यांच्यावर एसडीएम हॉस्पिटल, धारवाड येथे उपचार सुरू होते. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना बेनडेड घोषित केले.
त्यानंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचे ठरविले. त्यापैकी सदर महिलेची किडनी झिरो टॅफिक अंतर्गत केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल बेळगाव येथे आणण्यात आली. दुसरी किडनी केएसडीएम हॉस्पिटल येथे देण्यात आली असून सदर महिलेचे लिव्हर बेंगळूरच्या स्पर्श हॉस्पिटलला देण्यात येणार आहे.