नवी दिल्ली
हिरो इलेक्ट्रिक आगामी एक वर्षाच्या कालावधीत जवळपास 50,000 चार्जिंग केंद्रांची स्थापना करणार आहे. याकरीता कंपनी बोल्टसोबत हातमिळवणी करणार असल्याची माहिती आहे. हिरो इलेक्ट्रिकने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार हा करार पूर्ण केला असून संपूर्ण भारतामध्ये 750 पेक्षा अधिक हिरो इलेक्ट्रिकच्या टच पॉइंटमध्ये बोल्ट चार्जर लावण्यात येणार आहेत.
सदरच्या चार्जिंग केंद्र उभारणीतून आगामी काळात तब्बल 4.5 लाखापेक्षा अधिकच्या ग्राहकांना फायदा घेता येणार असल्याचे हिरोने स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त जवळपास 2,000 हिरो इलेक्ट्रिक चालक आपल्या घरांमध्ये बोल्ट चार्जिंग युनिटचा निशुल्क लाभ घेऊ शकणार असल्याचेही कंपनीने नमूद केले.
मिशन कार्बनमुक्त
आम्ही मिशन कार्बनमुक्त गतीशिलतेला चालना देण्यासाठी मजबूत ईव्ही चार्जिंग केंद्रे स्थापणार असल्याचा दावा हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल यांनी केला आहे.