नवी दिल्लीः
देशातील सर्वाधिक दुचाकी निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपली नवी मास्ट्रो झूम 110 सीसीची दुचाकी बाजारात लाँच केली आहे. कॉर्नरिंग लाइट फंक्शनसह येणारी ही एलइडी प्रोजेक्टर हेडलॅम्प व ब्लूटूथ कनेक्टिव्हीटीसहची ही पहिली स्कूटर असल्याचे बोलले जात आहे.
एलएक्स, व्हीक्स आणि झेडएक्स या तीन प्रकारात ही गाडी लाँच करण्यात आली असून यांची सुरुवातीची किंमत (एक्सशोरुम) 68,599 रुपये ते 76,699 रुपये (प्रकारानुसार) इतकी असणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या गाडीला झाइरोस्कोपिक एक्सेलेरोमीटर सेंसर दिला गेला आहे. गियरलेस स्कूटरच्या श्रेणीत मास्ट्रो एज व प्लेझरनंतर ही नवी तिसरी दुचाकी कंपनीने सादर केली आहे. सदरची नवी गाडी मॅट एब्राक्स ऑरेंज, ब्लॅक, स्पोर्ट्स रेड, पोलस्टार ब्ल्यू आणि पर्ल सिल्वर व्हाइट रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. 5.2 लिटरच्या क्षमतेची इंधन टाकी या गाडीला देण्यात आली आहे. ब्लू टुथ कनेक्टीव्हीटीसह फुल्ली डिजिटल एलइडी क्लस्टर व 12 इंचाचे अलॉय व्हील्स या गाडीला असणार असून युएसबी चार्जर, प्रंट ग्लोव्ह बॉक्स व एलइडी लॅम्पसह अंडर सीट स्टोरेजसाठी पुरेशी जागेची व्यवस्था या गाडीत आहे. सोबत इंटिग्रेटेड बेकिंग सिस्टम व प्रंट डिस्क ब्रेक या गाडीत असतील.