‘बेसिक इन्स्टिक्ट’ या चित्रपटाची अभिनेत्री शेरॉन स्टोनला 2011 मध्ये ब्रेन हॅमरेजनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. यामुळे तिला 2 वर्षांपर्यंत अभिनयापासून ब्रेक घ्यावा लागला होता. ही घटना घडल्यावर 20 वर्षांपर्यंत हॉलिवूडमध्ये दुर्लक्ष करण्यात आल्याचा खुलासा शेरॉनने केला आहे.
आरोग्याच्या कारणांमुळे माझी कारकीर्द पुन्हा रुळावर आली नाही. 7 वर्षांपर्यंत माझी प्रकृती सुधारत होती, तेव्हा माझ्याकडे कुठलेच काम नव्हते. 20 वर्षांपर्यंत मला हॉलिवूडपासून दूर रहावे लागले, तर त्यापूर्वी मी हॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होते असे शेरॉन यांनी म्हटले आहे. ब्रेन हॅमरेजमुळे शेरॉनला हॉलिवूडमधील स्वत:ची कारकीर्द गमवावी लागली होती. या धक्क्यातून ती कधीच पूर्णपणे सावरली नाही.
बेसिक इन्स्टिक्ट चित्रपटातील माझ्या एका दृश्यामुळे मला मुलांची कस्टडी गमवावी लागली. 1992 मध्ये प्रदर्शित चित्रपटाचा माझ्याविरोधात वापर करण्यात आला. त्या चित्रपटामुळे लोकांनी माझ्याबद्दल चुकीची धारणा तयार केली होती असा दावा शेरॉनने केला आहे.