नवी दिल्ली
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया यांनी मंगळवारी एसपी स्पोर्ट्स आवृत्ती सादर केली आहे. कंपनीने प्रीमियम कम्युटर मोटरसायकलमध्ये बीएस6 फेजच्या नवीन उत्सर्जन नियमांनुसार पूर्णपणे डिजिटल मीटर आणि ओबीडी2 यानुसार इंजिन सादर केले आहे. ही दुचाकी ई20 पेट्रोलवरीही चालणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने एसपी 125 स्पोर्ट्स आवृत्तीची किंमत ही 90,567 एक्स शोरुम ठेवली आहे. यासोबतच एचएमएसआय मोटरसायकलवर 10 वर्षांचे विशेष वॉरंटी पॅकेज देत आहे. भारतीय बाजारपेठेतील 125 सीसी कम्युटर मोटरसायकल सेगमेंटमध्ये होंडा एसपी हिरो ग्लॅमर, स्प्लेंडर, शाईन यांच्यासोबत स्पर्धा करणार आहे.