वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जपानी वाहन निर्मिती कंपनी हेंडा 2030 पर्यंत भारतात पाच नवीन होंडा एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स) सादर करण्याची योजना आखली आहे, ज्यात संपूर्ण इलेक्ट्रिक मॉडेलचा समावेश असणार आहे.
कंपनीने मंगळवारी भारतात आपली जागतिक मध्यम आकाराची होंडा एसयूव्ही इलेव्हेटचे अनावरण केले. हे वाहन ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस आणि मारुती सुझुकी ग्रॅड यांच्यासोबत स्पर्धा करणार असल्याचे संकेत आहेत.
इलेव्हेटची पूर्ण-इलेक्ट्रिक आवृत्ती तीन वर्षांत सादर केली जाईल.
येत्या काही महिन्यांत सणासुदीच्या काळात इलेव्हेट लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. होंडा कार्स इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ताकुया त्सुमुरा यांनी सांगितले की, ‘आमची योजना 2030 पर्यंत इलेव्हेटसह पाच एसयूव्ही लाँच करण्याची आहे.’ होंडाला इलेव्हेटसह भारतीय प्रवासी वाहन बाजारपेठेत आपले अस्तित्व मजबूत करायचे आहे. भारतात कंपनी सध्या सिटी आणि अमेझ या सेडान्सची विक्री करत आहे.