बुकिंगला प्रतिसाद मिळण्याची आशा : 2 वर्षे परिणाम
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोरोना महामारीचा प्रसार हा बऱयापैकी कमी असला तरी पूर्णपणे थांबलेला नाही. तरीही चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये हॉटेल उद्योगाच्या महसूलामध्ये बऱयापैकी वाढ दिसण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा विश्वास इक्रा या रेटिंग एजन्सीने नुकताच व्यक्त केला आहे.
हॉटेल उद्योगातील महसूल आणि नफा कोरोनापूर्व स्तरावर पोहोचण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये विरंगुळा व आरामासाठी म्हणून पर्यटकांचा छोटेखानी प्रवास वाढल्याचे दिसून आले आहे. याचाच फायदा हॉटेल उद्योगाला घेता आला आहे. व्यावसायिक यात्रेकरूंसोबतच विदेशी यात्रेकरू येण्याच्या प्रमाणामध्ये हळूहळू सुधारणा होत आहे.
प्रीमियम हॉटेलच्या बुकिंगला प्रतिसाद
रेटिंग एजन्सी इक्राच्या मते, चालू आर्थिक वर्षामध्ये देशभरातील प्रीमियम हॉटेलचे बुकिंगचे प्रमाण 68 ते 70 टक्के राहण्याची शक्मयता आहे. त्याचबरोबर हॉटेलमधील खोल्यांचे सरासरी भाडे 5 हजार 600 ते 5 हजार 800 रुपयापर्यंत राहण्याची शक्मयता सांगितली जात आहे. चालू आर्थिक वर्षात हॉटेल उद्योगाला चांगली सुरुवात करता आली आहे. पहिल्या तिमाहीमध्ये प्रीमियम गटातील हॉटेलमध्ये 56 ते 68 टक्के खोल्या बुक झाल्या होत्या. मागच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये यामध्ये चांगली वाढ दिसली आहे.
कोरोनाचा प्रभाव
गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या कारणास्तव हॉटेल उद्योग पूर्णतः कोलमडलेला होता. देशांतर्गत तसेच विदेशी पर्यटनही जवळपास 2 वर्षे ठप्प झाले होते. पण दुसरी लाट ओसरल्यावर व विदेशातून भारतात तसेच भारतातून विदेशात विमानसेवा सुरू झाल्यावर परिस्थिती सुधारत गेली.