राशिवडे / वार्ताहर
राशिवडे ( ता.राधानगरी ) येथील योगेश उर्फ मनोज वाडकर यांच्या राहत्या घराला शाँर्टसर्किटने आग लागून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले.घटनास्थळी मिळालेली माहिती अशी कि आज सकाळी सात वाजता योगेश वाडकर यांच्या घरामध्ये शाँर्टसर्किटने आग लागली. घरात जनावारांसाठी ठेवलेल्या गवताला आग लागल्याने आगीने रौद्र रुप धारण केलेआणि सर्व घराला आग लागली. तेथे जमलेल्या ग्रामस्थांनी प्रथम जनावरांना बाहेर काढले.त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
घरातील प्रापंचिक साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.मात्र जळण,वैरण ,घराचे साहित्य जळून खाक झाले.आग लागल्याचे समजताच नातेवाईक, मित्रमंडळी, परिसरातील ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.घटनास्थळी भोगावती साखर कारखान्याच्या अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले या घटनेचा पंचनामा तलाठी शहाजी चिंदगे,पोलिस पाटील उत्तम पाटील यांनी केला.