10 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज,
प्रतिनिधी / म्हापसा
सोमवारी रात्री 12.40 वाजण्याच्या दरम्यान दत्तवाडी म्हापसा येथे पाच घरांना आग लागून अंदाजे सर्वांचे मिळून 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. याबाबत तपास सुरू आहे. लक्ष्मी मारुती यालानवी यांचे 2 लाख, चंपा आयवॉक यांचे 1 लाख, रामदास चौहाण यांचे 2 लाख, अशोक दुर्गा तलवार यांचे 2 लाख, कस्तुरी तलवार यांचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. एकाच भिंतीच्या आजुबाजूला ही घरे लागून होती. लक्ष्मीच्या घराला प्रथम आग लागली. वाऱयाने ती सर्वत्र पसरल्याने आगीने मोठा पेट घेतला. यावेळी स्वयंपाक सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने मोठा पेट घेतला व आग सर्वत्र पसरली. आगीत भांडी, फर्निचर, टीव्ही संच, दागिने, कपडे, रोख रुपये आदी पूर्णतः जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आग विझविण्यास एकूण चार बंबचा वापर करण्यात आला.