लॅपटॉप निर्मितीत घेणार सहकार्य
वृत्तसंस्था / मुंबई
तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी एचपी यांनी भारतात क्रोमबुकच्या निर्मितीसाठी गुगलसोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रोमबुकच्या उपकरणांची निर्मिती चेन्नईजवळच्या कारखान्यात केली जाणार असल्याचे एचपीकडून सांगण्यात येते. गुगलसोबत कंपनी क्रोमबुकची निर्मिती करणार आहे.
एचपी ही कंपनी भारतात 2020 पासून कार्यरत आहे. एचपी ऑगस्ट 2020 पासून तेथे लॅपटॉपचे तसेच डेस्कटॉपचे उत्पादन यशस्वीपणे घेत आली आहे. कंपनीच्या उत्पादनांना ग्राहकांचा प्रतिसादही लाभतो आहे. एचपी इंडियाचे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी यांनी सांगितले की, भारतात क्रोमबुक लॅपटॉपची निर्मिती करत भारतीय विद्यार्थ्यांना परवडणारे पीसी सादर करण्याचा प्रयत्न कंपनीचा आगामी काळात असणार आहे.