वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग यांच्या गॅलेक्सी झेड फ्लिप 5 व गॅलेक्सी फोल्ड 5 या दोन स्मार्टफोनला भारतीयांनी प्रचंड प्रतिसाद नोंदवला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सदरचे दोन फोन लॉन्च करण्याची घोषणा केल्यानंतर केवळ 28 तासांमध्येच एक लाखहून अधिक जणांनी भारतामध्ये या फोनचे बुकिंग केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 26 जुलैला कंपनीने फोल्डेबल प्रकारातील दोन फोन्सची घोषणा केली होती. त्याच दिवशी भारतामध्ये या स्मार्टफोनकरता बुकिंग सुरू झाले होते. 18 ऑगस्टपासून दोन्हीही फोन विक्री करता उपलब्ध केले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सदरच्या फोनला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल कंपनीने ग्राहकांचे आभार मानले आहेत. सदरचे नवीन फोन हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आले असून त्यांचा ग्राहकांना निश्चितच आनंद घेता येणार आहे, असे मत सॅमसंग नैऋत्य आशियाचे सीईओ जे बी पार्क यांनी व्यक्त केले आहे.
काय आहेत वैशिष्ट्यो
6.7 इंचाची फुल्ल एचडी डिस्प्ले स्क्रीन, 12 मेगापिक्सल बॅकला व 10 मेगापिक्सल कॅमेरा फ्रंटला, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 ची चीप, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज ही काही वैशिष्ट्यो या फोन्सची सांगता येतील.