हॉटेलच्या बंद खोलीत सुरु होता जुगार : छाप्यात तब्बल अकरा जुगारींना अटक,रोख 27 लाखांसह कॅसिनो साहित्य जप्त
प्रतिनिधी /पणजी
येथील ‘क्राऊन’ या तारांकीत हाटेलमध्ये सुरु असलेल्या बेकायदेशीर पॅसिनोवर पणजी पोलिसांनी छापा मारून 11 जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर जुगाराच्या साहित्यासह 27 लाख 13 हजार 310 रुपये रोख रक्कमही जप्त केली आहे. संशयितांच्या विरोधात जीडीडीपीजी कायद्याच्या 3 व 4 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राऊन या तारांकीत हॉटेलच्या बंद खोलीत पॅसिनोपध्दती प्रमाणे बेकायदेशीर जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या संशयितांमध्ये कमलदीप सिंग (उत्तर प्रदेश), कातिकापल्ली परमेश, नवीन कुमार, पाकेर अखिल (तिघेही हैद्राबाद येथली), मंजूनाथ चालवादी, संजय पुनतकर (दोघेही कर्नाटक) वाल्मिकी पीनहेईर (सालसेत) सर्वेश राणे (सत्तरी) चंद्रबहादूर प्रधान (सिक्कीम) मनिराम थारू व नर्मल कुमार चौधरी (नेपाल) यांचा समावेश आहे.
बंद खोल्यांमध्ये चालतात कॅसिनो
पॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी आणि जीवाचा गोवा करण्यासाठी राज्यात मोठय़ा पर्यटक येत असतात. त्याचाच फायदा घेऊन मांडवी नदीतील कायदेशीर पॅसिनोबरोबरच राज्यात मोठय़ाप्रमाणात बेकायदेशीर पॅसिनोही सुरु असल्याचे दिसून येत आहे. येथील काही पंचतारांकीत हॉटेलांच्या बंद खोलीत किंवा काही बंद घरामध्ये जुगार अड्डे सुरु असतात.
घरातच पोकर पद्धतीचा जुगार
काही दिवसापूर्वीच पणजी पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई करून तब्बल 25 जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून काही रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले होते. एक बंद घरातच हा जुगार सुरु होता. पॅसिनो प्रमाणेच पोकर पध्दतीचा विविध किमंतीच्या चिप्सद्वारे हा जुगार सुरु असल्याचे उघड झाले होते.
‘क्राऊन’मधील बेकायदा कॅसिनो
येथील क्राऊन हॉटेलमध्येही गॅलेक्सी पॅसिनो बेकायदेशीररित्या सुरु असल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि अकरा संशयितांना अटक केली. रोख रक्कमेसह विविध किमंतीच्या 671 चिप्स, दोन टेबल व 8 खुर्च्या तसेच जुगार खेळण्याचे इतर साहित्यही जप्त केले आहे. पणजी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमिर तरल, मयूर पणशीकर, संकेत पोकरे, हवालदार नीलेश नाईक, नितीन गावकर, कॉन्स्टेबल सयेश उस्कईकर, इरुमय्या गुरय्या, गुलशन नाईक, प्रसन्न मंगेशकर, विकास नाईक, सोनू गावस, संगम म्हार्दोळकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल नुतन गावस यांनी ही कारवाई केली आहे.
पिळर्ण येथे आयपीएल बेटिंगवर छापा
पर्वरी पोलिसांनी काल रविवारी पिळर्ण येथील एका सदानिकेत छापा टाकून बेकायदा आयपीएल क्रिकेट सामन्याचे बेटिंग करत असताना तिघा राजस्थानी संशयिताना अटक केली असून त्यांच्याकडून सहा मोबाईल, एक लॅपटॉप आणि दीड लाख रोख रुपये जप्त केले आहे आहेत. संशयित रोनक माली, पवन शर्मा आणि मोहित व्यास यांना अटक करण्यात आली आहे. सर्व संशयित राजस्थानचे आहेत.
पिळर्ण ग्रीन वॅली येथील गॅलेक्सी इमारतीतील एका सदानिकेत पर्वरी पोलिसानी छापा टाकून बेकायदा आयपीएल क्रिकेट सामन्याचे बेटिंग करत असताना तिघांना रंगेहात पकडले असून दीड लाख रुपये तसेच मोबाईल व लॅपटॉप जप्त केले आहे. पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताराम मळीक यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या कामी त्याला पोलिस संदीप परब आणि उत्कर्ष देसाई यांनी मदत केली आहे.