डिचोली : डिचोली तालुक्मयात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळ. दि. 19 सप्टें. रोजी घराघरांत स्थापन करून पुजण्यात आलेल्या पाच दिवशीय गणेशमूर्तींचे ठगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर याठ या गजरात विसर्जन करण्यात आले. तर सात, नऊ, अकरा व एकविस दिवशीय गणपतींची सेवा काही घरांमध्ये सुरू आहे. या सणानिमित्त अद्यापही गावागावांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. डिचोली तालुक्मयातील बहुतेक ग्रामीण भागांमध्ये वार्षिक पाच दिवशीय गणेशोत्सव साजरा केला जातो. यावषीही हा सण मोठ्या उत्साहात झाला. काही भागांमध्ये विशेषत: शहरी भागातील घरांमध्ये दिड दिवशीय गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दिड दिवशीय गणेशांचे बुध. दि. 20 रोजी विसर्जन झाले. तर पाच दिवशीय गणेशांचे काल शनि. दि. 23 सप्टें. रोजी रात्री जल्लोषात विसर्जन झाले.
सर्व ठिकाणी स्थानिक पंचायती व नगरपालिकांकडून गणेश विसर्जन स्थळांची व वाटेची साफसफाई, प्रकाशयोजना करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना गणेशमूर्ती हातात किंवा डोक्मयावर घेऊन विसर्जनासाठी जाणे सोपे झाले. आवडते दैवत गणेशाला निरोप देताना बच्चे कंपनी मात्र भावूक झालेली दिसत होती. डिचोली तालुक्मयातील मेणकुरे या गावातील बहुतेक घरांमध्ये दरवषी सात दिवशीय गणेशोत्सव साजरा केला जातो. आकर्षक सुबक व मोठ्या आकाराच्या मूर्ती पुजण्याची या गावात परंपराच आहे. घराघरांमध्ये एकापेक्षा एक अशा आकर्षक गणेश मूर्ती पहायला मिळतात. या गावातील अनेक घरांमध्ये विखुरलेली सर्व लहान मोठी कुटुंबे एकत्रित येतात आणि मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. या सात दिवसांत काही घरांमध्ये किर्तन, भजन असे कार्यक्रमही साजरे केले जातात. मेणकुरे प्रमाणेच साळ या गावातही मोठ्या व आकर्षक गणेश मूर्ती पुजण्याची परंपरा आजही लोकांनी जोपासली आहे. या गावातही पाच, सात दिवशीय गणेश चतुर्थी पहायला मिळते. एकतेचे दर्शन घडविणाऱ्या या सणामुळे अनेक कुटुंबे एकत्रित येतात.