प्रतिनिधी/ बेळगाव
गुलाल, फटाके आणि डॉल्बीला फाटा देत सोमवारपेठ, मंगळवारपेठ, टिळकवाडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने टाळ-मृदंगाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली. यासाठी कोल्हापूर येथील वारकरी विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कोणताही धांगडधिंगाणा न घालता भजनात दंग होऊन काढलेली विसर्जन मिरवणूक इतर मंडळांसाठी आदर्श ठरली.
प्रारंभी शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजींच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ झाला. येथील मंडळ मागील काही वर्षांपासून गुलाल, फटाके आणि डॉल्बीला फाटा देत गणेशोत्सव साजरा करत आहे. याचा इतर गणेशोत्सव मंडळांनी बोध घेणे आवश्यक आहे. पाश्चिमात्य संस्कृतीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींची भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली.
विघ्नहर्त्याला निरोप देताना आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे, यासाठी पारंपरिक पद्धतीने टाळ-मृदंगाचा गजर करत गणेशमूर्ती विसर्जनस्थळी नेण्यात आली. यामध्ये लहान वारकऱयांचाही सहभाग होता. ही आदर्श विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी झाली होती.