प्रतिनिधी /बेळगाव
एका 26 वर्षीय युवकाच्या ब्रेनडेड नंतर नातेवाईक पुढे आले. त्यांनी सदर युवकाचे लिव्हर, दोन्ही किडन्या आणि हृदयाचे दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या युवकाचे लिव्हर बीजीएस बेंगळूरला पाठविण्यात आले. केएलईहून सकाळी नऊ वाजता ग्रीन कॉरिडोर मधून हुबळी विमानतळावर दाखल झाले. यानंतर दहा वाजून 15 मिनिटांनी इंडिगो विमानाने बेंगळूला रवाना झाले.त्या युवकाच्या दोन्ही किडनी धारवाड एसडीएम हॉस्पिटलला देण्यात आल्या. तर हृदयाचे केएलई मध्ये प्रत्यारोपण सुरू आहे.