मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती, पेडणेत मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची विकास यात्रा
पेडणे : राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे ठरणारे प्रकल्प म्हणजे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि धारगळ येथील आयुष हॉस्पिटल प्रकल्प आहेत. मोपा विमानतळ आणि आयुष प्रकल्पाच्या माध्यमातून गोव्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारला नऊवर्ष पूर्ण झाल्यामुळे विकास यात्रा 2023 अंतर्गत संपूर्ण गोव्यात उभारलेल्या मोठ्या प्रकल्पांना भेटी देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. हे प्रकल्प गोव्यातील जनतेला कळावे हा हेतू ठेवून आज या प्रकल्पाला आम्ही भेट दिली आहे. राज्याचा विकास होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोवा सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. धारगळ येथील आयुष हॉस्पिटल प्रकल्पाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, मये मतदारसंघाचे आमदार प्रमेंद्र शेट, मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजापचे सचिव दयानंद सोपटे, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधुकर परब, पेडणे भाजप मंडळ सरचिटणीस तथा नगरसेविका उषा नागवेकर, पेडणे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, नगरसेवक मनोज हरमलकर, वारखंड-नागझर सरपंच गौरी जोसलकर, विर्नोडा सरपंच सरपंच सुजाता ठाकूर, इब्रामपूर सरपंच अशोक धावस्कर, खाजने – अमेरे-पोरस्कडे सरपंच निशा हळदणकर, वजरी सरपंच अनिल शेट्यो, उपसरपंच सज्जना परब, पृंच शामिका नाईक, वारखंड पंच कविता कांबळी, पंच मयुरी तुळस्कर, पंच ऊपेश मावळणकर, हळर्ण पंच सिद्धी राऊळ, सागर राऊळ, माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, मांद्रे येथील भाजप मंडळाचे आणि भाजप केंद्रीय समितीच्या पदाधिकारी नयनी शेटगावकर, दीपा तळकर अनंत गडेकर, मिलिंद तळकर, प्राजक्ता कान्नईक आदी यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आयुष हॉस्पिटल, मोपा विमानतळ तसेच इतर प्रकल्प उभारण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रयत्नामुळे मोपा विमानतळ प्रकल्प आणि आयुष इस्पितळ प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत. याचा लाभ स्थानिक आणि तसेच गोमंतकीय युवक युवतीनी घ्यावा. आयुर्वेद शैक्षणिक क्षेत्रातही आपले नाव उज्ज्वल करावे. आज या ठिकाणी पेडणेतील तसेच राज्यातील स्थानिक बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळणार आहेत, असेसे मुख्यमंत्री म्हणाले. सुऊवातीला आयुर्वेद संस्थांच्या प्रमुख डॉ. सुजाता कदम यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ओपीडी आणि अन्य विभागाला मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री तसेच आमदारांनी भेटी देऊन यावेळी ऊग्णांकडे चर्चा करत हॉस्पिटलची पहाणी केली.