नवी दिल्ली
भारताच्या पाम तेलाच्या आयातीत मे महिन्यात कपात नोंदवली गेली आहे. मे महिन्यातील पहिल्या 21 दिवसात 2,61,000 टन इतके पाम तेल भारतात पाठवले असून पुढील 11 दिवसात 1,50,000 टन पाम तेल भारतात दाखल होणार असल्याची माहिती आहे. ही भारताची आयात 27 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन देशातून पाम तेलाची भारत आयात करतो.