क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील दिलीप दामले हायस्कूलच्या वार्षिक क्रीडास्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून यशोधर जैन, मुख्याध्यापक आर. पी. पाटील, एम. एम. बिर्जे आदी उपस्थित होते. यशोधर जैन यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आले. जोतिबा भांदुर्गे याने क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द करण्यात आले. समृद्धी शिंदेने खेळाडूंना शपथ दिली. या स्पर्धेत जोतिबा बिर्जे व नताशा पावशे यानी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. क्रीडाशिक्षक एच. बी. पाटील यांनी सुत्रसंचालन तर मोहिनी बिर्जे यांनी आभार मानले.