पुणे / प्रतिनिधी :
गुटख्यावर बंदी असतानाही ठिकठिकाणी गुटखा विक्री सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गुटखा विपेत्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी एकाच दिवसात गुटखा विपेत्यांवर 25 गुन्हे दाखल झालेले असताना, दुसऱया दिवशी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करीत 17 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भारती विद्यापीठ, सहकारनगर, अलंकार, उत्तमनगर, दत्तवाडी, खडकी, वानवडी, हडपसर, कोंढवा, शिवाजीनगर, लोणी काळभोर आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱयांवर कडक कारवाई करून मोठय़ा प्रमाणात गुटख्याचे साहित्य जप्त केले. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थ व पानमसाला हा मानवी आरोग्यास अपायकारक पदार्थ विक्रीकरिता बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी जवळ बाळगल्याने संबंधितांवर कारवाई करून गुटखा साहित्य जप्त करून आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.
अधिक वाचा : पुणे जिल्ह्यातील नऊ गुन्हेगार एकाच वेळी तडीपार
शिवाजीनगर पोलिसांना एफ. सी. रस्त्यावर ज्ञानेश्वर पादुका चौकात तीन फेब्रुवारी रोजी रात्री गुटखा विक्रीचा एक टेम्पो येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एपीआय भोलेनाथ अहिवळे यांच्या पथकाने सदर भागात सापळा रचून संबंधित वर्णनाचा टेम्पो आला असता टेम्पोचालक ज्ञानेश्वर जगताप (वय 28, रा. कर्वेनगर, पुणे) यास अटक केली. त्याच्याकडील तपासात 39 हजार रुपयांचा प्रतिबंधीत विमल पान मसाला गुटखा व अडीच लाख रुपयांचा टेम्पो असा दोन लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली आहे.