पाचगाव वार्ताहर
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील संवेदनशील असणाऱ्या पाचगाव मध्ये रविवारी कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत सुमारे 70 टक्के मतदान झाले. पाचगाव, आर के नगर परिसरातील मतदान केंद्रावर मतदारांनी रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती.
पाचगाव ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार सतेज पाटील खासदार धनंजय महाडिक गटात अटीतटीची लढत झाली. मात्र सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. पाचगाव येथे सहा वॉर्डांमध्ये 17 ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदासाठी मतदान झाले. पाचगाव मध्ये 16253 मतदारांपैकी 11484 मतदारांनी मतदान केले. हे मतदान 70.66 टक्के झाले. सर्व उमेदवारी आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.