कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी खुर्द गावच्या नवीन वसाहतीमधील शेषण कट्टा ट्रॉफी, मेन गल्ली ज्योतीनगरमधील गणराज युवक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे नुकतेच थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून एपीएमसी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर, उपनिरीक्षक मृत्युंजय पट्टद, ग्रा. पं. सदस्य प्रशांत पाटील उपस्थित होते.
प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष गजानन गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर ब्रह्मलिंग देवस्थानचे पूजन पोलीस उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर व जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यष्टींचे पूजन पोलीस उपनिरीक्षक मृत्युंजय पट्टद यांनी केले. ट्रॉफीचे अनावरण ग्रा. पं. सदस्य राकेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विनायक राजगोळकर, विकास चव्हाण, शेषण कट्टय़ाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.