Inauguration of District Level Table Tennis Tournament sponsored by Indian Oil
इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी तसेच महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक निशाकांत पराडकर यांच्या हस्ते झाले. हा उद्घाटन समारंभ जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवणच्या श्रीमती ‘सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉल’मध्ये संपन्न झाला. निशाकांत पराडकर यांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंना शुभेच्छा देताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचं नाव टेबल टेनिस खेळामध्ये उज्वल करावं असं सांगितलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिसच्या खेळाडूंना संधी मिळावी आणि टेबल टेनिस खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी इंडियन ऑइलच्या सहकार्याने ही स्पर्धा मालवण मध्ये दरवर्षी आयोजित केली जाते.
मालवण / प्रतिनिधी