बेळगाव : रणकुंडये गावात हायस्कूलच्या विभागीय स्तरावरील क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण 14 हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, विभागीय क्रीडामेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुण दाखवण्यास मदत होणार आहे. त्यांनी विभागीय स्तरावर चांगली कामगिरी केल्यास त्यांची क्रीडा प्रतिभा राज्य व राष्ट्रीय स्तरावरही चमकू शकेल. यावेळी त्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
सदरचे क्रीडा स्पर्धेचे आयोजन यजमानपद हे यावषी रणकुंडये हायस्कूलला मिळाले असल्याने, गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मंगळवारी फक्त वैयक्तिक क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारपासून सामूहिक क्रीडा होणार आहेत. दोन वर्षांनी स्पर्धा आयोजन केल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भरमाणी पाटील, गवसबी ताशिलदार, सुलोचना कोलकार, रामलिंग मोरे, सखू भैरू पाटील, मुरारी पाटील, विठ्ठल पाटील, बीईओ आर. पी. जुट्टनवर, श्याम खिरोजी यांच्यासह विविध माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते.