बेळगाव – नव्याने बांधण्यात आलेल्या बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे येत्या मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन होणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकाच्या नूतनीकरणाची योजना 2009 पासून आखली आहे. जानेवारी 2017 मध्ये कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. बस स्थानक कार्यरत करण्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा आणि इमारत तयार आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार बस स्थानकाचे नूतनीकरण जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते मात्र दुर्दैवाने ते रखडले आहे. मध्यवर्ती बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 32,48,54,759.59 एवढे रुपये खर्च करण्यात आला असून सदर बस स्थानकाचे काम हर्षा कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आले होते. हे बस स्थानक 3.8 एकर जागेत विस्तारले असून त्याला लागून एन डब्ल्यू के आर टी सी डिव्हिजनल वर्कशॉप 4.68 एकर जागेत स्थापित आहे.
Trending
- ग्रीन पॉवर शुगर्स उच्चांकी दर देणार- संग्रामसिंह देशमुख
- शिक्षण क्षेत्रात होणारे बदल स्विकारणे हेच खरे मोठे आव्हान : प्रा. संजय ठिगळे
- Sangli : पाडळी सोसायटी अपहार प्रकरणी तक्रारी वाढल्या
- कबनूर : ‘किल्ल्यांची दुरावस्था’ बोलक्या देखाव्यांने वेधले लक्ष
- Sangli : दिपक केसरकरांनी केले आळतेच्या जिल्हा परिषद शाळेचे कौतुक
- उदगिरी साखर कारखाना दररोज पाच हजार मेट्रिक टन गाळप करणार – डॉ. राहुल कदम
- Kolhapur : शिक्षणाच्या खासगीकरणा विरोधात शिक्षक रस्त्यावर ; घोषणांनी लक्ष वेधले
- ऑनलाईन वीज बिल भरण्यात सांगली शहर अव्वल तर विटा दुसऱ्या स्थानावर