वेंगुर्ले (वार्ताहर)-
क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांचे व्दारा सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी यांचे मार्फत एस. के. पाटील. शिक्षण प्रसारक मंडळ, पाट पंचक्रोशी पाट हायस्कुलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कोल्हापूर विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धांचा शुभारंभ वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती सुनील मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कोल्हापूर विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत कोलहापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील १६ संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाक्रिडा अधिकारी विद्या शिरस, शालेय शिक्षण महासंघाचे अध्यक्ष अजय शिंदे, सांगली क्रिडा अधिकारी जमीर अतार, तालुका क्रिडा अधिकारी विजय शिंदे, कोल्हापूर विभागाचे व्हॉलीबॉल सचिव निलेश चमणकर, एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाटचेचेअरमन समाधान परब, संचालक देवदत्त साळगांवकर, राजेश सामंत, दिपक पाटकर, सुभाष चौधरी, मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, माजी चेअरमन मिलींद केळूसकर, वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख निलीन्मांमोरकर, तळवडेचे माजी मुख्याध्यापक श्याम मालवणकर आदींचा समावेश होता.
या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावरील जिल्हाक्रिडा अधिकीर विद्या शिरस, शालेय शिक्षण महासंघाचे अध्यक्ष अजय शिंदे, कोल्हापूर व्हॉलीबॉल सचिव निलेश चमणकर, एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट चे चेअरमन समाधान परब, वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर, सांगली क्रिडा अधिकारी जमीर अत्तार यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेसाठी १४, १७, व १९ वर्षांखालील मुलगे व मुली अशा १६ संघाच्या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट च्या हायस्कूलमार्फत सुयोग्य नियोजनाने करण्यात आले आहे.