वार्ताहर /उचगाव
तुरमुरी येथे स्पोर्ट्स क्लब आयोजित तुरमुरी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागराज जाधव होते.
तुरमुरी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गणेश प्रतिमा पूजन राजू जाधव यांच्या हस्ते, हनुमान प्रतिमा पूजन ग्रामपंचायत सदस्य सुरेश राजूकर, जिजामाता प्रतिमा पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा वैशाली खांडेकर, सरस्वती प्रतिमा पूजन सिद्धाप्पा कांबळे, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन मारुती खांडेकर, छत्रपती संभाजी महाराज प्रतिमा पूजन परशराम अष्टेकर, शहाजी महाराज प्रतिमा पूजन इराप्पा खांडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पूजन शंकर कांबळे व दीपप्रज्वलन प्रकाश चलवेटकर, एन. एम. बोकडे, लक्ष्मण जाधव, परशराम खांडेकर, आर. एम. खांडेकर, महेंद्र जाधव, रघुनाथ खांडेकर, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले.